लाडकी बहिन योजनेच्या 3 टप्प्याची मंजूर यादी जाहीर, चेक करा पात्र यादीत नाव, पहा संपूर्ण माहिती
महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना देत आहे. महाराष्ट्र सरकारकडे या योजनेसाठी दोन कोटींहून अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी एक कोटीहून अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या 3000 रुपयांचा लाभ मिळाला आहे.
तथापि, अनेक महिलांचे अर्ज काही कारणास्तव रद्द करण्यात आले होते, परंतु त्या महिलांनी अर्जाची त्रुटी दुरुस्त करून तो अर्ज परत सादर केला आहे. तसेच, ज्या महिलांची अर्ज मंजूर आहेत पण त्या योजनेचा लाभ घेतलेल्या नाहीत, तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज सादर केला आहे, त्यांना या योजनेचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे त्याची पात्र यादी (Ladki Bahin Yojana 3rd Approval List) जाहीर केली आहे. चला पाहूया कोणकोणत्या महिलांना या सप्टेंबर महिन्यात जमा होणाऱ्या टप्प्यात पैसा मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा 1 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले होते, अशा सर्व महिलांना 14, 15 आणि 17 ऑगस्ट या कालावधीत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले आहेत.
लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा
लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा 24 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले होते, अशा सर्व महिलांना 29, 30 आणि 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.
पात्र यादीत नाव कसे चेक करावे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यात लाखो महिलांच्या खात्यात जमा करणार आहे. तुम्हाला योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात लाभ मिळावा यासाठी मंजूर यादी (Ladki Bahin Yojana 3rd Approval List) मध्ये तुमचे नाव आहे का हे कसे पाहता येईल, याबद्दल माहिती मिळाल्यावर, ज्या महिलांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, अशा सर्व महिलांना या योजनेचा तिसरा टप्पा मिळणार आहे.
ह्या महिलांना मिळतील 4500 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै व ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. परंतु काही कारणांमुळे त्यांना पैसे मिळालेले नाहीत. अशा सर्व महिलांना 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत तिसऱ्या टप्प्यात 4500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
0 Comments