Advertisement

Latest Jobs

6/recent/ticker-posts

Download Health Card: सातबारा उताऱ्यात मोठा बदल: मोबाइलवर बघा | 7/12 New Update Information

Advertisement

Advertisement

 


नमस्कार मित्रांनो,

आमच्या आजच्या या नवीन लेखात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. नेहमीप्रमाणे, आजही आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणि उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण सातबारा उताऱ्यात झालेले बदल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

सातबारा उतारा हा आपल्या जमिनीचा मालकी हक्क दर्शवणारा अत्यंत महत्त्वाचा कागद आहे. हा उतारा आपल्या जमिनीच्या सर्व माहितीचा आरसा असतो. सातबारा उताऱ्यात जमीन कोणाच्या नावावर आहे, किती क्षेत्र आहे इत्यादी माहिती दिली जाते. त्यामुळे प्रत्येक शेतमालक किंवा व्यक्तीकडे सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.

सातबारा उताऱ्यात महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी बदल केले गेले आहेत. अलीकडेच, महाराष्ट्र शासनाने सातबारा उताऱ्यावर काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांची माहिती प्रत्येक व्यक्तीला आणि शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही हा लेख तुमच्यासाठी आणला आहे. लेखात, सातबारा उताऱ्यात झालेल्या महत्वाच्या बदलांची माहिती दिली आहे. त्यामुळे हा लेख पूर्णपणे वाचा.

सातबारा उताऱ्यात नेमका काय बदल झाला आहे?

तुम्हाला माहीतच असेल की इंटरनेटच्या प्रगतीमुळे दैनंदिन कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल झाला आहे. याच सुमारास, हस्तलिखित सातबारा ऑनलाइन उपलब्ध झाला आणि शेतीसंबंधित कामे सोपी व जलद झाली. आता सातबारा उताऱ्यात आणखी एक बदल झाला आहे – म्हणजेच सातबारा उताऱ्यावर अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक, म्हणजेच ULPIN नंबर दिला जाणार आहे. ULPIN म्हणजे युनिक लँड पार्सेल आयडेंटीफिकेशन नंबर.

राज्यातील सर्व सातबारा उताऱ्यावर यापुढे ULPIN नंबर दिसणार आहे. यामुळे सरकारला मालमत्तेचा शोध घेणे अधिक सोपे होईल. ULPIN नंबरमुळे देशातील कोणत्याही मालमत्तेवर स्वतंत्र क्रमांक दर्शविला जाईल आणि दस्ताऐवजाची ओळख पटवणे सोपे होईल.

ULPIN मुळे सातबारा उताऱ्यावर खालील बदल होणार आहेत:

सातबारा उताऱ्यावर गट क्रमांक व उपविभागाच्या उल्लेखाआधी ULPIN क्रमांक टाकला जाईल.

सातबारा उताऱ्यावर ULPIN संबंधित एक QR कोड दिसेल. हा कोड सातबाऱ्याच्या उजव्या कोपऱ्यात असेल आणि त्या ठिकाणी एक क्रमांक दिला असेल.

सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह असेल.

सातबारा उताऱ्यावर डाव्या बाजूला अकरा अंकी ULPIN क्रमांक दिला जाईल.

नागरिकांना आधार क्रमांक मिळतो आणि त्याद्वारे संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळते, अगदी तशाच पद्धतीने हा ULPIN काम करेल.

थोडक्यात, ULPIN म्हणजे मालमत्तेचा आधार क्रमांक आहे. यामुळे तुमचा सातबारा उतारा आणि त्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळवता येईल.

आशा आहे की हा लेख तुम्हाला उपयोगी पडला असेल आणि तुम्हाला यातील माहितीचा फायदा होईल. हा लेख तुमच्या मित्र-मत्रिणींना शेअर करा आणि धन्यवाद!

Advertisement

Post a Comment

0 Comments

Advertisement