Advertisement

Latest Jobs

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी Download करा, यादीत तुमचे नाव तपासा | Majhi Ladki Bahin Yojana

Advertisement

Advertisement

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलैपासूनच अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी अर्जदारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेले आहेत. ज्या लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले असतील त्यांच्या पात्रता याद्या यायला २९ जुलैपासून सुरुवात झालेली आहे. तर या पोस्ट च्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ची जिल्हा आणि वॉर्ड निहाय PDF फाईल कशी डाउनलोड करायची आणि त्यात आपले नाव कसे चेक करायचे ते पाहणार आहोत.

१५ ऑगस्टला या महिलांच्या खात्यावर येणार एवढे पैसे – माझी लाडकी बहिण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज सुरु झालेत आणि हि अर्जप्रक्रिया आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

नुकतेच राज्य सरकारने जाहीर केले आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व हप्त्यांचा लाभ महिलांना मिळणार आहे, जरी त्यांनी अर्ज लवकर केला तरी आणि जरी अर्ज उशिरा केला तरी. परंतु ज्या महिलांचा अर्ज पूर्ण झालेला असेल आणि पात्र झालेला असेल अशा महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी पासून लाभहस्तांतरण करण्यास सुरुवात होईल.

म्हणजे जर तुम्ही आता पात्र असाल किंवा तुमचे नाव पात्रता यादीत असेल तर तुम्हला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे मिळून एकूण ३,००० रुपये थेट तुमच्या खात्यावरती जमा होतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी

राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पात्र यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत जवळपास एक कोटी एक्याऐंशी हजार महिलांचे माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. या योजनेअंतर्गत पहिला हप्ता १५ ऑगस्ट च्या नंतर म्हणजेच रक्षाबंधनाच्या वेळेस येणार असल्याची अधिकृत माहित राज्य सरकारने दिलेली आहे . त्या अनुषंगाने पात्र महिलांची यादी कुठे पाहता येणार याबद्दलची माहिती खाली दिले आहे, ते वाचून घ्या.

तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून तुमच्या जिल्ह्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी Download करा.

लाभार्थी यादी डाउनलोड करा

तुमच्या जिल्ह्यानुसार आणि वॉर्ड नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी Download केल्यानंतर यादीत तुमचे नाव आहे कि नाही चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

गूगल च्या ड्राईव्ह PDF रीडर मधून डाउनलोड केलेली फाईल ओपन करा.

स्क्रीन च्या उजव्या बाजूला वरच्या कोपर्यात सर्च बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

तुमचे नाव, मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून सर्च करा.

नारी शक्तीदूत अ‍ॅप वरून आपल्या अर्जाचे स्टेटस पहा

ज्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असतील ते आता कुठेही न जात आपल्या स्वतः च्या मोबाईल च्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज पात्र झाला कि अपात्र झाला ते पाहू शकतात.

नारी शक्तिदूत वरून लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सर्वप्रथम तुम्हाला आपल्या फोने मध्ये नारी शक्तिदूत हे अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावे लागेल, जर अ‍ॅप डाउनलोड केलेले असेल तर गुगळे प्ले स्टोर वरती जाऊन ते उपडेट करून घ्यावे.

आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून अ‍ॅप मध्ये लॉगिन करून घ्यावे. जर लॉगिन करताना काही अडचणी येत असतील तर थोड्या वेळाने पुन्हा लॉगिन करण्याचा प्रयत्न करावा, लॉगिन होऊन जाईल.

Advertisement

Post a Comment

2 Comments

Advertisement