Advertisement

Latest Jobs

6/recent/ticker-posts

मतदान यादीत तुमचं नाव चेक करा, मोबाईल मधून फक्त १ मिनिटात | Voter List Download 2024

Advertisement

Advertisement

मित्रांनो, सध्या जिकडे तिकडे निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे आता लोकसभा निवडकूकांच्या तारखा शाहीर झाल्या आहेत. 19 एप्रिल ते 1 जुन 2024 या दरम्यान आपल्या संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. आणि निवडणुकीचा हा उत्सव योग्य निष्पक्ष प्रकारे साजरा व्हावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहेत. तसेच दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष सुद्धा जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे कॅम्पेन व रॅली राबवित आहे.

मित्रांनो, निवडणुकीत ज्या प्रकारे पक्ष असतो त्याच प्रमाणे निवडणुकीत अजून एक महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे मतदार. म्हणूनच कोणता नेता निवडून येईल हे ठरविणारा देखील मतदारच असतो. आणि एकदा का निवडणुका जाहीर झाल्या की लगेच काही दिवसात मतदार यादी देखील जाहीर केली जाते. महत्वाचे म्हणजे ही मतदार यादी प्रत्येक वेळी बदलत असते. त्यामुळे अनेकदा मतदान च्या वेळी आपले नाव च मतदान यादीत नाही, असे प्रकार घडतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मतदान पूर्वी मतदार यादीत आपआपले नाव आहे का नाही हे तपासलं पाहिजे.

पण मित्रांनो, तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कारण आता घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही ते एक मिनिटांत पाहू शकता. आणि ते ही तुमच्या मोबाईल वरून. हो मित्रांनो, तुमच्या मोबाईल वरून तुम्ही वोटर हेल्पलाईन ऍप द्वारे व वेबसाईट द्वारे तुमचे नाव मतदान यादीत आहे का ते तपासू शकता. चला तर मग मतदान यादीत नाव कसे शोधायचे. ते ही मोबाईल वरून फक्त एक मिनिटांत. या बद्दल जाणून घेऊ या. पण त्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

मतदान यादीत नाव शोधणे

मित्रांनो, मतदान यादीत तुमचे नाव आहे की नाही हे शोधण्याच्या दोन पद्धती आज आपण बघणार आहोत. एक म्हणजे वोटर हेल्पलाईन ऍप द्वारे व दुसरे म्हणजे वेबसाईट द्वारे.

1) Voter helpline App ( वोटर हेल्पलाईन ऍप)

स्टेप 1: मित्रांनो, तूमचं किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचं मतदार यादीत नाव आहे की नाही ते शोधण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले गुगल प्ले स्टोअर वरून Voter Helpline ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

स्टेप 2: त्या नंतर तुम्हाला ऍप ओपन करायचे आहे आणि जर तुमचं आधीच ऍप वर अकाउंट असेल तर फक्त मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. आणि जर तुम्ही ऍप वर नवीन असाल तर तुम्हाला New User या ऑप्शन वर क्लिक करून तुमचं अकाउंट ओपन करायचे आहे.

आणि त्या नंतर तुमचा मोबाईल नंबर, नाव टाकून नंतर ओटीपी वगैरे टाकून पासवर्ड तयार करायचा आहे व अकाउंट ओपन करायचे आहे.


स्टेप 3: तर मित्रांनो, अकाउंट तयार केल्यावर लॉगिन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकायचा आहे व सेंड ओटीपी वर क्लिक करायचे आहे. आता तुमच्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी दिलेल्या जागी टाकून Login Now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला वरती Search Your Name In Electoral Roll असा ऑप्शन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लीक करायचे आहे.

स्टेप 5: त्या नंतर नाव सर्च करण्यासाठी तुम्हाला चार ऑप्शन दिसतील.

  • Search by Mobile: यात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमचं नाव सर्च करू शकता.
  • Search by QR Code: यामध्ये तुम्ही तुमच्या मतदान कार्ड वरील क्यूआर कोड स्कॅन करून नाव सर्च करू शकता.
  • Search by Details: या मध्ये तुम्ही तुमचे डिटेल्स म्हणजे नाव वगैरे टाकून सर्च करू शकता.
  • Search by EPIC Number: या मध्ये तुम्ही तुमच्या मतदान कार्ड वरील epic नंबर टाकून सुद्धा तुमचं नाव मतदान यादीत शोधू शकता.

स्टेप 6: आता आपण इथे Search by Details हा पर्याय वापरून मतदार यादीत आपले नाव कसे शोधायचे ते जाणून घेणार आहोत. त्यासाठी खाली तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स म्हणजेच तुमचे नाव, आडनाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, लिंग, वय, राज्य, जिल्हा व विधानसभा मतदार संघचे नाव अशी सर्व माहिती भरायची आहे व नंतर Search बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7: या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचे नाव व इतर माहिती आलेली दिसेल. म्हणजेच तुमचे मतदान यादीत नाव आहे, असा त्याचा अर्थ आहे. ही नावाची स्लिप तुम्ही डाउनलोड किंवा शेअर देखील करू शकता. त्यासाठी ही खाली ऑप्शन दिलेले आहेत.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे तुम्ही तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदान यादीत आहे की नाही हे वोटर हेल्पलाईन ऍप द्वारे चेक करू शकता. आणि जर सर्च केल्या नंतर ही तुम्हाला तुमचं नाव यादीत दिसत नसेल तर तुम्ही तुमचे डिटेल्स पुन्हा एकदा तपासून पहा किंवा इतर तीन पर्यायांचा वापर करावा.

2) eci.gov.in वेबसाईट द्वारे

मित्रांनो, मतदान यादीत नाव आहे की नाही हे चेक करण्याची अजून एक पद्धत आहे. यात तुम्ही वेबसाईट द्वारे तुमचे नाव मतदान यादीत नाव आहे की नाही ते बघू शकता. ते कसे ते पाहू या…

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://voters.eci.gov.in या वेबसाईट वर जायचे आहे. त्यानंतर पेज वर खाली तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यातील Search by Electoral Roll या ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 2: इथे सुद्धा तुम्हाला तीन ऑप्शन दिले जातील. Search by epic number, Search by mobile number, आणि Search by details. यापैकी कोणतेही एक ऑप्शन निवडून त्या द्वारे तुम्ही तुमचे माव मतदान यादीत आहे की नाही ते शोधू शकता.

स्टेप 3: तीन पद्धतींपैकी कोणत्याही एक पद्धतीचा वापर करा, आणि तुम्ही तुमच्या वोटर आयडीची संपूर्ण माहिती पाहू शकता. View details या लिंक वर क्लीक करून तुम्ही नावाची स्लिप तुम्ही डाउनलोड हि करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मतदान यादीत आपले नाव आहे की नाही, ते मोबाईल वरून चेक कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Voter Card Official Website: Click Here

Advertisement

Post a Comment

0 Comments

Advertisement