नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील कंपनी मध्ये परमनंट किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस वर काम करत असाल तर भारत सरकार तुम्हाला वैद्यकीय उपचारसाठी मोफत विमा देते त्यालाच ESIC म्हणतात. दर महिन्याला तुमच्या पगारातून PF प्रमाणेच ESIC रक्कम कट होते. तर आजच्या लेखामध्ये याच ESIC विमा योजने बद्दल सविस्तर माहिती बघू.
मित्रांनो, सामान्य लोकांच्या किंवा कामगारांच्या या अडचणी लक्षात घेऊन भारत सरकारने वैद्यकीय आणीबाणीच्या काळात कामगारांना आधार देण्यासाठी वैद्यकीय सुरक्षा देण्यासाठी ESI किंवा ESIC योजना सुरू केली. जे लोक गरीब परिस्थितीमुळे योग्य औषधोपचार करू शकत नाही अशा परिवारांना ESIC act 1948 नुसार, मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी विमा योजना सुरू करण्यात आली आहे. याच ESIC योजने बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच या विमा योजनेचे कामगारांना अनेक फायदे ही मिळणार आहेत. ते कोण-कोणते फायदे आहेत ते पुढे आपण जाणून घेऊ या.
ESIC म्हणजे काय?
सर्वात पहिले ESIC म्हणजे काय, त्याबद्दल जाणून घेऊ या
मित्रांनो, ESIC म्हणजे Employees State Insurance Corporation. यालाच मराठीमध्ये कर्मचारी राज्य विमा महामंडळ किंवा राज्य कामगार विमा योजना असेही म्हणतात. ही योजना केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाणारी योजना आहे. या मध्ये सरकारी किंवा खाजगी कंपन्या आणि विविध संस्था यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा दिला जातो. शिवाय ज्या कंपनीत 10 किंवा 20 किंवा त्या पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील आणि ज्यांचे वेतन 21,000 रुपये पर्यंत आहे, त्याच कंपन्यांमध्ये हा विमा दिला जातो.
ESIC योजनेचा उद्देश
मित्रांनो, राज्य कामगार विमा योजना ही 1948 मध्ये अमलात आणली गेली. जर कर्मचारी सरकारी किंवा खाजगी संस्थेत काम करत असताना होणाऱ्या आजारपण जसे की, गंभीर आजार, मॅटरनिटी लिव्ह/ प्रसूती रजा, कायमस्वरूपी अपंगत्व, मृत्यू झाल्यास, या सर्वातून कामगारांचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा देता यावी या उद्देशाने केंद्र सरकारने राज्य कामगार विमा योजना सुरू केली. व नंतर ही योजना संपूर्ण देशात लागू केली गेली. आज महाराष्ट्रात ही योजना 18 जिल्ह्यांत लागू आहे. तसेच 44 केंद्रे व 61 हॉस्पिटल द्वारे ही योजना महाराष्ट्रात काम करते.
ESIC योजना कोणाला व केव्हा लागू होते?
- मित्रांनो, कलम 2(12) अधिनियम नुसार 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या क्षेत्रातील कंपन्यांना ही योजना लागू होते.
- यासोबतच कलम 1(15) अधिनियम नुसार जिथे वीस किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत त्या कंपन्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, चित्रपट गृह, हॉटेल्स, दुकाने, उपहारगृह, रस्ते मोटार परिवहन मंडळे, वर्तमानपत्र आस्थापने इत्यादी.
- याशिवाय कलम 1(5) नुसार ही योजना 20 किंवा त्या पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या खाजगी व्यक्ती व शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा लागू करण्यात आली आहे.
मित्रांनो, राज्य कामगार योजनेची अंमलबजावणी केलेल्या क्षेत्रात कामगारांना दोन पद्धतीने लाभ दिला जातो.
- वैद्यकीय स्वरूपात व
- रोख स्वरूपात
याशिवाय राज्य कामगार विमा योजनेत कर्मचारी तसेच कंपनी या दोघांच्या रकमेचे काँट्रिब्युशन असते. ही रक्कम वेळोवेळी बदलत असते. सध्या ESIC मध्ये कर्मचाऱ्याच्या वेतनातून 0.75% अनुदान दिले जाते, तर कंपनी कडून 3.25% अनुदान दिले जाते.
137 रुपये प्रति दिवस वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्याला वेतनातून योगदान द्यावे लागत नाही. तसेच यार वेतनाची मर्यादा दवखील ठरवून दिलेली आहे. ज्यात दिनांक 1 मे 2010 पासून वेतनाची मर्यादा 15,000 रुपये इतकी होती. मात्र 2016 मध्ये यात वाढ करून ती 21,000 रुपये इतकी वेतन मर्यादा करण्यात आली. म्हणजेच 21 हजार रुपये पर्यंत वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्याचा या योजनेत समावेश होतो.
ESIC सुविधा व लाभ
आता या योजनेत मिळणाऱ्या सुविधा व लाभ यांबद्दल जाणून घेऊ या:-
- मित्रांनो, कर्मचाऱ्याला कामावर रुजू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून विमा संरक्षण दिले जाते.
- या योजने अंतर्गत विमाधारकाला व त्याच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय उपचार, औषधे, निदान चाचण्या आणि ESIC रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये हॉस्पिटलायझेशन सह इतर ही वैद्यकीय लाभ प्रदान केले जातात. यामध्ये बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण उपचार यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच जर एखाद्या रुग्णाचा आजार जास्त असेल तर त्याला इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवले जाऊ शकते. व त्याचा संपूर्ण खर्च ही योजना करते.
- त्याच्या आजारपणात आरोग्य सेवा या परवडणाऱ्या दरामध्ये मिळतात.
- तसेच जर कर्मचारी वैद्यकीय रजेवर असेल तर त्याला 91 दिवसाच्या वेतनाच्या 70 टक्के इतका लाभ मिळतो.
- या योजने अंतर्गत महिलांना मॅटर्निटी साठी सहा महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. या सहा महिन्यांचे वेतन राज्य कर्मचारी विमा योजने कडून दिले जाते. तसेच गर्भपात, किंवा गर्भधारणेमुळे उद्भवलेल्या आजारासाठी देखील ही योजना कर्मचाऱ्याला रोख लाभ प्रदान करते.
- याशिवाय कर्मचाऱ्याला तात्पुरते अपंगत्व आले असल्यास तो बरा होई पर्यंत त्याला पगाराच्या 90 टक्के वेतन दिले जाते.
- तसेच कायमचे अपंगत्व आल्यास वेतनाच्या 90 टक्के रक्कम ही आयुष्यभर मिळते.
- अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या योजने अंतर्गत सर्दी, ताप, खोकला या सर्व आजारांवर मोफत उपचार केले जातात. तसेच इसिक हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. तसेच ऑपरेशन देखील केले जातात. याशिवाय हॉस्पिटलमध्ये रुग्णासोबत आणखी एका व्यक्तीची रहाण्यासोबतच जेवणाची सोय देखील केली जाते.
- तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबियास पेन्शन सुविधा देण्यात येते. आणि ही सुविधा तीन भागात विभागली जाते. पहिली म्हणजे कर्मचार्याची पत्नी, दुसरी कर्मचार्याची अपत्ये म्हणजेच मुले आणि तिसर म्हणजे कर्मचाऱ्याचे आई वडील.
ESIC नोंदणी कुठे व कशी करावी?
मित्रांनो, या योजनेसाठी कंपनीच आपल्या कर्मचाऱ्याची नोंदणी ही करते. यासाठी कर्मचार्याची तसेच त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांची माहिती द्यावी लागते. तसेच कंपनीला नॉमिनी चे नाव ही द्यावे लागते. एकदा नोंदी झाली की नऊ महिन्या नंतर या योजनेची सुविधा व लाभ मिळतात.
तसेच इसिक या योजने द्वारे कंपनीने योजनेसाठी नोंदणी केल्या नंतर कर्मचाऱ्याला ESIC कार्ड जारी केले जाते. या कार्ड मध्ये कर्मचार्याची सर्व माहिती असते. उदा. कर्मचाऱ्याचे नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि ईएसआय नोंदणी क्रमांक. तसेच त्यात कंपनीचे नाव आणि पत्ता यांसारखे तपशील देखील असतात. मित्रांनो, कर्मचार्यांसाठी ESIC कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे कारण ते त्यांना ईएसआय योजनेंतर्गत विविध लाभांसाठी पात्र बनवते. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याचे ESIC कार्ड सुरक्षित आणि अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि जर कार्ड हरवले किंवा खराब झाले तर, कर्मचार्यांनी ईएसआय द्वारे जारी केलेले डुप्लिकेट कार्ड मिळविण्यासाठी त्यांच्या कंपनीला त्वरित कळवावे.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ESIC किंवा ESI म्हणजे काय व त्याचे फायदे काय आहेत, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.
FAQ
ESIC योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?
मित्रांनो, कारखाने, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, चित्रपट गृहे आणि उपहारगृह, वर्तमानपत्र आस्थापने, यासारख्या विशिष्ट प्रकारच्या आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी पगाराचे निकष पूर्ण करत असतील तर ते ESIC कव्हरेजसाठी पात्र आहेत.
ESIC चे फुल फॉर्म काय आहे?
मित्रांनो, ESIC चे फुल फॉर्म Employees State Insurance Corporation असे आहे.
ESIC योजनेसाठी योगदान कसे केले जाते आणि त्याचे नियम काय आहेत ?
मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी योगदान दर त्यांच्या वेतनाच्या 0.75% आहे आणि कंपनीचे योगदान 3.25% आहे. तसेच ईएसआयसी कपातीसाठी पगार मर्यादा रु. 21,000 प्रति महिना इतका आहे.
खाजगी रुग्णालयासाठी ESIC क्लेम करू शकतो का?
मित्रांनो, तसं पाहिलं तर, ईएसआयसी कायद्या नुसार, कर्मचाऱ्यांचे उपचार फक्त ईएसआयसी रुग्णालये किंवा दवाखान्यां मधूनच घ्यावे लागतात. परंतु, आपत्कालीन परिस्थितीत, खाजगी रुग्णालयातून उपचार घेतल्यास, ESIC तुमच्या हॉस्पिटलायझेशन चा सर्व खर्च करते. तसा ESIC चा क्लेम करावा लागतो.